विचार करायला लावणारं...‘बरड’चं थीम सॉँग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2016 1:31 PM
बरड म्हणजे माळरान, खडकाळ, नापिक जमीन. बरडीवर होणारी सरकारी संस्थांची हालचाल आणि त्यानंतर पैशांमुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा या सर्व परिस्थितीचे चित्रण म्हणजे बरड हा चित्रपट
बरड म्हणजे माळरान, खडकाळ, नापिक जमीन. बरडीवर होणारी सरकारी संस्थांची हालचाल आणि त्यानंतर पैशांमुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा या सर्व परिस्थितीचे चित्रण म्हणजे बरड हा चित्रपट. नुकताच या चित्रपटाचं थीम गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्याची बाहेर प्रेक्षकांमध्ये चर्चा होत आहे. इमेज एसआरके प्रोडक्शन्स ‘बरड’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं थीम गाणं तुम्हांला विचार करायला लावेल. त्या गाण्याचे बोल आणि संगीत त्यांच्या थीम गाण्याची धुंद कधी चढेल सांगता येत नाही. हे गाणं ऐकताना एकंदरीत गाण्यात दाखवण्यात आलेली परिस्थिती पाहून व्यक्ती त्यामध्ये होऊन जातो.कुणी रुजवली होती बीज रक्ताचे शिंपूनीकुणी विकली जमीननाती-गोती उसवूनीनाती आपुलीच लावली पणाशीनाती आपुलीच कुणाला झाली रे नकोशी...बरड थीम गाण्याचे बोल मिथिला कापडणीस यांनी लिहिले असून त्याला संगीत आणि आवाज रोहन-रोहन याने दिले आहे.अथर्व मुवीज प्रस्तुत, देवेंद्र कापडणीस निर्मित आणि कुमार गांधी सहनिर्मित बरड या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी महादेव घाडगे यांनी केले आहे. यामध्ये सुहास पळशीकर, भारत गणेशपुरे, शहाजी काळे, राजन पाटील, संजय कुलकर्णी, किशोर चौगुले, धनंजय जामदार आदी कलाकर अभिनय आहे. बरड हा सिनेमा येत्या १० जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.