Join us  

'रंग माझा वेगळा' मालिकेतील ही अभिनेत्री दिसणार 'अल्याड पल्याड' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 3:46 PM

Alyad Palyad Movie : 'अल्याड पल्याड' चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. या मालिकेला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील एक अभिनेत्री 'अल्याड पल्याड' (Alyad Palyad Movie ) सिनेमात झळकणार आहे. ही अभिनेत्री कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अनुष्का पिंपुटकर या सिनेमात काम करताना दिसणार आहे. तिने मालिकेत मोठ्यापणीच्या कार्तिकीची भूमिका साकारली होती.

'अल्याड पल्याड' चित्रपटात अनुष्का पिंपुटकरने सरपंचाची मुलगी अनुष्काची भूमिका साकारली आहे. दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते.  सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची  उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड' हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. ‘अल्याड पल्याड' चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी  यांचे आहे.

कार्यकारी निर्माते संतोष खरात आहेत.लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत. रंगभूषा अभिषेक पवार यांची आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची  जबाबदारी  स्वानंद देव व विष्णू  घोरपडे यांनी सांभाळली आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.