वंदना गुप्ते (Vandana Gupte) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली आहे. आता त्यांचा अशी ही जमवाजमवी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यात त्यांच्यासोबत अभिनेते अशोक सराफ मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा १० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान वंदना गुप्ते यांची एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वंदना गुप्ते यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. काय असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे ना. तर वंदना गुप्ते यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांचे लव्हलेटर्स पोहचवले आहेत. खुद्द अभिनेत्रीनेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
वंदना गुप्ते यांचे राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात त्यांची घरे असल्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी येणेजाणेही आहे. तसेच शर्मिला आणि वंदना यांची खूप आधीपासूनची मैत्री आहे. वंदना गुप्ते यांनी राजश्री मराठीला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला की, त्यांनी राज आणि शर्मिला यांचे लव्हलेटर्स एकमेकांपर्यंत पोहोचवली आहेत.
''नंतर तर त्यांच्या चिठ्ठ्याही यायच्या आणि त्या...''
वंदना गुप्ते यांनी सांगितलं की, ''मी राज आणि शर्मिला यांची प्रेमपत्र पोहचवली आहेत. मोहन वाघ यांची मुलगी शर्मिला या राज ठाकरेंच्या पत्नी आहेत. मी एक किस्सा आठवतोय, दादरमधील मकरंद सोसायटीबाहेर जो रस्ता आहे तिथून मी एकदा येत असताना अचानक तिथे शर्मिला आली. ती मला सारखं म्हणत होती, वंदूताई मी तुझ्याबरोबर होते हा. का तर शर्मिला यांचे वडील मोहन वाघ गेटबाहेर त्यांची वाट बघत होते. कुठे कुठे गेली हे पाहत होते. तेव्हा मला कळलं की हीचं काहीतरी सुरू आहे. नंतर तर त्यांच्या चिठ्ठ्याही यायच्या आणि त्या मी पोहोचवत होते. आताही ते अगदीच आमच्या शेजारी राहतात, त्यामुळे आमचे एकमेकांच्या घरी येणंजाणं असतं.''