Join us

कलाविश्वातील तीन विनोदवीर महाराष्ट्राला खळखळून हसविण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:02 IST

कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर या कॉमेडी शोचं मुंबईत आयोजन होत असून १२ ऑगस्टपासून ह्या विनोद वीरांची हास्याची नॉनस्टॉप फटकेबाजी प्रेक्षक अनुभवणार आहेत.

छोट्या पडद्यावर रसिकांचे भरपूर मनोरंजन करणारे विनोदवीर त्याच बरोबर अनेक चित्रपट, टीव्ही कार्यक्रमांतून ओळख निर्माण करणारे स्टँडअप कॉमेडियन, अभिनेता 'पैचान कौन' फेम नवीन प्रभाकर, नितीन भांडारकर आणि राजकुमार रँचो आपल्या नाविंन्यपूर्ण कॉमेडीची भेट घेऊन येत आहेत. "पैचान कोन" नवीन प्रभाकर आणि दोन भन्नाट विनोदवीर हास्याचा बुफे घेऊन आहेत. "कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर" या कॉमेडी शोचं मुंबईत आयोजन होत असून १२ ऑगस्टपासून ह्या विनोद वीरांची हास्याची नॉनस्टॉप फटकेबाजी प्रेक्षक अनुभवणार आहेत.

कॉमेडी नाईट्सचा पहिला प्रयोग गडचिरोली या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला. त्या ठिकाणी रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सध्या या त्रिकुटाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात शोसाठी विचारले जात आहे. नवीन प्रभाकरने आतापर्यंत स्टँडअप कॉमेडीचे तीन हजारहून अधिक जगभरात शोज केले आहेत. काही शोमध्ये हे त्रिकुट आपल्याला एकत्र दिसले आहे.  त्यातून त्याने त्यांनी स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

नवीन प्रभाकर आणि टीम समाजातील छोट्या छोट्या गोष्टीवर कोपरखळी मारताना दिसणार आहेत. त्याच बरोबर बॉलिवूड सिनेमा मिमिक्री राजकारण समाजकारण या विषयांवर प्रत्येकजण बोलताना आपण पाहणार आहोत. ह्या त्रिकुटापैकी प्रत्येकाची कॉमेडी सादरीकरणाचा पोत हा एकमेकांपासून वेगळा असून लहान मुलापासून बुद्धिजीवी प्रेक्षकांसाठी सुद्धा हा कार्यक्रम मनोरंजनाची मेजवानीच ठरणार आहे.

टॅग्स :नवीन प्रभाकर