Join us

'थ्री इडियट्स'मधील चतुरची मराठी सिनेमात एन्ट्री, 'आईच्या गावात मराठीत बोल' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 18:34 IST

'आइच्या गावात मराठीत बोल' या सिनेमातून ओमी वैद्य मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.  नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यामध्ये ओमीचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. 

'थ्री इडियट्स' या सिनेमात चतुरची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता ओमी वैद्य मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' या सिनेमातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.  नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यामध्ये ओमीचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. 

सुपरहिट ठरलेल्या 'थ्री इडियट्स' सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारून ओमीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या सिनेमात हिंदीमुळे त्याची फजिती झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता 'आईच्या गावात मराठीत बोल' चित्रपटात चतुर मराठी बोलताना दिसणार आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. 

'आईच्या गावात मराठीत बोल' या सिनेमात ओमीबरोबर संस्कृती बालगुडे, अभिषेक देशमुख, ध्रुव दातार, पार्थ भालेराव, किशोरी शहाणे, उदय टिकेकर अशी स्टारकास्ट आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :ओमी वैद्य मराठी चित्रपटसेलिब्रिटी