आजपासून मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 5:12 AM
मोर्चा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मोठा जनसमुदाय.सध्या अनेक गोष्टींसाठी मोर्चा काढला जातो. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी, आपल्यावर ...
मोर्चा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मोठा जनसमुदाय.सध्या अनेक गोष्टींसाठी मोर्चा काढला जातो. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी, आपल्यावर अन्याय झाल्यावर अशा अनेक बाबींसाठी मोर्चा काढला जातो.पण मोर्चा कुणासाठी, कुणाला दाखवायला, कुणाला सांगायला, कुणाकडे मागायला? अशीच काहीशी पार्श्वभूमी असलेला साज एंटरटेनमेंट निर्मित अखिल देसाई दिग्दर्शित मोर्चा नावाचा मराठी सिनेमा आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.दिग्दर्शक अखिल देसाई सिनेमाबद्दल सांगतात कि, मोर्चा सिनेमाबद्दल एका वाक्यात सांगायचे झाले तर, सिनेमा म्हणजे आजच्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेविरोधात मोर्चा बांधणी आहे. निवडणूक होतात. आपण उमेदवारांना निवडून देतो. निवडून आल्यावर त्यांना गुर्मी येते आणि ते जनतेला गृहीत धरतात यावरच हा सिनेमा कडाडून भाष्य करतो. गावात तर विकास नाहीच नाही, पण मुंबई सारख्या शहरात सुद्धा माणूस घरी सुखरूप परत येईल कि नाही याची शाश्वती नाही.मुंबईत कोसळलेला एलफिस्टन पूल असेल, बलात्कार, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीवर आपण फक्त बोलत बसतो नाहीतर फक्त मोर्चे काढत बसतो.असे किती दिवस अजून आपण मोर्चे काढत बसणार आहोत.या प्रश्नांबाबत आपण राजकीय नेत्यांना सरळ प्रश्न कधी विचारणार? कुठवर त्यांची हुकुमशाही सहन करणार याबद्दल सिनेमा भाष्य करतो.आज आपण सुरक्षित आहोत का ?, अंधश्रद्धा बाजार अजून चालू का आहे ?, बेरोजगारी नाहीशी झाली की नाही ?, सावकारी व्याजाचा फास सुटला कि नाही? आणि भ्रष्टाचार का संपत नाही? याला जबाबदार कोण? मोर्चा सिनेमा पाहून प्रेक्षक स्वतःला असे काही प्रश्न विचारतील आणि किमान स्वतः तरी जागे होऊन जागरूक होतील असा आशावाद दिग्दर्शक अखिल देसाई यांना आहे. सिनेमात संजय खापरे, कमलेश सावंत, दिगंबर नाईक, अनिकेत केळकर, अंशुमन विचारे, दुष्यंत वाघ, प्रशांत नेमन, किशोर चौगुले, आरती सोळंकी, उदय सबनीस इ. कलाकरांच्या प्रमुख भूमिका आहेत.