Join us

​‘मंत्र’ मध्ये पुष्कराज चिरपुटकर साकारतोय ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 4:35 AM

पुष्कराज चिरपुटकरला अभिनयासाठी राज्यशासनाच्या २०१८ च्या चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनयासाठी दोन नामांकनं मिळाली आहेत. त्यातील एक ‘मंत्र’ या सिनेमातील सहाय्यक ...

पुष्कराज चिरपुटकरला अभिनयासाठी राज्यशासनाच्या २०१८ च्या चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनयासाठी दोन नामांकनं मिळाली आहेत. त्यातील एक ‘मंत्र’ या सिनेमातील सहाय्यक अभिनेत्याच्या कामासाठी मिळाले. ड्रीमबुक प्रोडक्शन्स आणि वेदार्थ क्रिएशन्सच्या ‘मंत्र’ मध्ये तो एका तरुण पुरोहिताच्या, ‘काशिनाथ’च्या भूमिकेत भाव खाऊन गेलाय. या पेशात काम करणाऱ्या सध्याच्या तरूणांचे वास्तव काशिनाथच्या रुपाने पहिल्यांदाच पडद्यावर आलंय. पुष्कराजचा मिश्कील स्वभावाचा काशिनाथ जसा हसवतो, तसाच भावूक प्रसंगातही हेलावूनही टाकतो. चित्रपट आणि नाटक निवडताना पुष्कराज बराच चुझी आहे. पण ही नामांकन पाहाता कामाबाबतची त्याची स्ट्रॅटजी बरोबर असल्याचे जाणवते. हर्षवर्धन लिखित – दिग्दर्शित ‘मंत्र’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.आपल्या अभिनयाने आशु म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर याने प्रेक्षकांचे मन जिंकले. पुष्कराज हा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. या मालिकेतील त्याच्या आशु या भूमिकेला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्याचबरोबर ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेत त्याच्यासोबत अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, स्वानंदी टिकेकर झळकले होते. या सर्व कलाकारांची मस्ती तरूणांना खूपच भावली होती. म्हणूनच या मालिकेची पसंती पाहता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. दिल दोस्ती दोबारा असे या मालिकेचे नाव होते. या मालिकेतील पुष्कराजच्या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या मालिकेनंतर तो अनेक चित्रपटांमध्ये झळकला. बापजन्म या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. त्याचबरोबर हा अभिनेता काही महिन्यांपूर्वीच बॉलिवुड चित्रपटातदेखील पाहायला मिळाला होता. हा त्याचा पहिलाच बॉलिवुड चित्रपट होता. बॉर्न टू बुधिया सिंग असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटातील त्याच्या छोटया भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता मंत्र या चित्रपटातील त्याची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडेल अशी त्याला खात्री आहे.