अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज त्यांची पहिली मराठी डायरेक्ट-टू-सर्विस ऑफरिंग 'पिकासो'चा ट्रेलर रिलीज केला. पुरस्कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकदाम अभिनीत चित्रपट 'पिकासो' अस्वस्थ मद्यपी वडिल व त्याच्या मुलाच्या संबंधित उत्तम कथेच्या माध्यमातून दशावतार कलेची झलक दाखवते.
शिलादित्य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग, तसेच सह-लेखक तुषार परांजपे यांनी केले आहे. कोकणामधील दुर्गम गावातील एक तरूण विद्यार्थी गंधर्व राष्ट्रीय पातळीवरील पिकासो आर्टस् स्कॉलरशिपसाठी निवडण्यात येतो. स्पर्धेच्या विजेत्याला त्याची कला अधिक निपुण करण्यासाठी पिकासोचे उगमस्थान स्पेन येथे जाण्याची संधी मिळते. गंधर्व त्याची झालेली निवड आणि स्पर्धेतील प्रवेशाकरिता भरावयाच्या फीबाबत त्याच्या आईवडिलांना सांगतो. पण त्याचे आईवडिल त्याला सांगतात की त्यांना हे परवडणार नाही. पांडुरंग त्याच्या स्थितीवर मात करून स्वत:सोबतच त्याच्या मुलासाठी त्याच्या कलेला वाव देईल का?, हे चित्रपटात पहायला मिळेल.
भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्य १९ मार्च २०२१ पासून फक्त अमेझॉन प्राइम व्हिडिओवर मराठी नाट्य ‘पिकासो’चा विशेष वर्ल्ड प्रिमिअर पाहू शकतात.