Join us

डिस्को सन्या मनोरंजनाचे जबरदस्त पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 7:29 AM

 डिस्को सन्या हा चित्रपट निमार्ते, संगीतकार आणि लेखक सचिन पुरोहित- अभिजीत कवठाळकर  यांचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट ५ ...

 डिस्को सन्या हा चित्रपट निमार्ते, संगीतकार आणि लेखक सचिन पुरोहित- अभिजीत कवठाळकर  यांचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट ५ आॅगस्टला  प्रेक्षकांच्या पाहायला मिळणार आहे. एकसे बढकर एक कम्पोझिशन, दजेर्दार आणि तरुणाईला वेड लावेल अशी गाणी या चित्रपटात ऐकण्यास मिळणार आहेत. ना चीज को सन्या कहते है...डिस्को सन्या, अशी तुफान डायलॉगबाजी करणारा डिस्को सन्या हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. अनाथ असल्याला मुलांची नेहमीच समाजाकडून  पिळवणूक केली जाते. त्यांना जीवनातील दु:ख, संकटे यांचा सामना करावा लागतो पण या सगळ््या परिस्थितीवर मात करून आपले आयुष्य जगत ही मुले जगत असतात. त्यांची जगण्याची ही उमेद म्हणजे चिंगाबुंगा होय. ही उमेद प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट व्यवसायिक दजार्ची फॅमिली मनोरंजनअसून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. त्यामुळे डिस्को सन्या  हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भावेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक नियाज मुजावर यांचे असून चित्रपटाची कथा व पटकथा नियाज मुजावर, सचिन पुरोहित व अभिजीत कवठाळकर यांची आहे. तसेच झी म्यूजिक कंपनीने या चित्रपटातील गाणी रिलीज केली आहेत. पार्थ भालेराव आणि अभिनेता संजय खापरे ही नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.