Join us

तेव्हा तू कुठे होतीस? हेमांगी कवीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टवर तृप्ती देसाईंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:45 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही हेमांगीच्या ‘बेधडक’ पोस्टचे स्वागत केले आहे. पण भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र हेमांगीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एक बोचरा प्रश्न केला आहे.

ठळक मुद्देहेमांगीने तिच्या फेसबुकवर अत्यंत परखड आणि थेट विषयाला हात घालणारी एक मोठी पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवीच्या (Hemangi Kavi) ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टची सध्या जबरस्त चर्चा आहे. निर्माता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी हेमांगीच्या या पोस्टला पाठींबा दिलाय. मराठी चित्रपटसृष्टीतील अन्य कलाकारांनीही हेमांगीच्या या ‘बेधडक’ पोस्टचे स्वागत केले आहे. पण भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र हेमांगीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एक बोचरा प्रश्न केला आहे. आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडविरोधात रान पेटवलं तेव्हा तू कुठे होतीस? असा सवाल तृप्ती देसाई (Trupti Desai ) यांनी केला आहे.सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडविरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही..., अशी सुरूवात करत तृप्ती देसाई यांनी एक खरपूस फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.  आम्ही आंदोलनं केली, पण अशा वेळी हे लोक का साथ देत नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी हेमांगीच्या पोस्टवर विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे.  (Trupti Desai reacted on Hemangi Kavi  bai boobs and bra post )

तृप्ती देसाई लिहितात..

सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही... त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक  बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना  हेमांगी यांनी.... जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो ,अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही.इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो?असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली "हे ही नसे थोडके..मनापासून शुभेच्छा.माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक  संकल्पना अशी आहे की आमच्या भूमाता फाऊंडेशन च्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात  #नो_ब्रा_डे  साजरा केला पाहिजे. कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते. विरोध होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वत:हून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा-तृप्ती देसाई 

हेमांगीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्ट...

‘टीशर्ट मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती सहज पद्धतीने आपण पाहतो किंवा त्याकडे पाहून दुर्लक्ष करतो.. तो एक सवयीचा भाग म्हणूनच ना. मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी. ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी कसंही. तो नक्कीच त्यांचा निर्णय आहे. पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने का बघितले जावे किंवा हे का लादले जावे?’, असा थेट सवाल  हेमांगीने तिच्या पोस्टमधून विचारला होता.

  

टॅग्स :हेमांगी कवी