Join us  

तृप्ती खामकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, झळकणार 'झोंबिवली' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 12:38 PM

अभिनेत्री तृप्ती खामकर मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

अभिनेत्री तृप्ती खामकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गिरगीट'मध्ये माहीच्या भूमिकेत झळकली. यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती झोंबिवली या मराठी चित्रपटात दिसणार आहे.

झोंबिवली या चित्रपटात तृप्ती खामकरने मालतीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा खूप हटके आहे. या भूमिकेबद्दल तृप्ती सांगते की,  “मी जास्त काही उघड करू शकत नाही पण हे एक अतिशय गोड पात्र आहे. जे तुम्ही मला अनेकदा साकारताना पाहिले असेल. पण मी ही भूमिका निवडली कारण ती व्यक्तिरेखा स्वतःच खूप शक्तिशाली आहे. ती महिला सक्षमीकरणाची हाक देते, ती स्वतःसाठीच आहे. ज्याचा विचार आपल्या समाजातील महिलांसाठी खूप गरजेचा आहे.”

अभिनेत्री अलीकडेच चित्रपटाच्या टेक स्क्रिनिंगला हजेरी लावताना दिसली होती, त्याबद्दल तिला विचारले असता ती म्हणते, “टेक स्क्रिनिंग विलक्षण होते मला खात्री आहे की प्रेक्षकांना चित्रपट आवडेल. पडद्यावर येण्यापूर्वी संगीत आणि तांत्रिकदृष्ट्या बरेच बदल होतील.”

हॉरर-कॉमेडी प्रवास मिळणार अनुभवायला झोंबिवली या चित्रपटात हॉरर-कॉमेडी प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. या चित्रपटात तृप्ती खामकर, अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अमेय वाघललित प्रभाकर