प्रकाश झोतात राहण्याचा स्टार्सचे केविलवाणे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:08 AM
सत्तेत एखादे सरकार असले की वर्षभरात त्यांनी काय कामगिरी केली किंवा जनहिताचे कोणते निर्णय घेतले याचा लेखाजोखा प्रगतिपुस्तकामधून मांडला ...
सत्तेत एखादे सरकार असले की वर्षभरात त्यांनी काय कामगिरी केली किंवा जनहिताचे कोणते निर्णय घेतले याचा लेखाजोखा प्रगतिपुस्तकामधून मांडला जातो. याला सध्याचे सत्ताधारी भाजप सरकारही अपवाद ठरलेले नाही. केंद्र सरकारच्या प्रगतीचा आढाव्याचे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हमखास मांडले जाऊन त्यावर ताशेरे देखील ओढले जात आहेत. मग वर्षभरात चित्रपटांमधले कोणते चेहरे फेमस ठरले त्यांचे प्रगतीपुस्तक का चाचपले जाऊ नये असे 'लोकमत' ला वाटत आहे. शाळेमध्ये जसे निकाल लागतात तसेच प्रमाणपत्र देऊन कोणती अभिनेत्री नंबर वन पदावर राहिली किंवा कोणता अभिनेत्री आपले स्थान अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरला हेच आम्हाला जाणून घ्यायचयं. पण ते तुमच्याकडून म्हणजे प्रेक्षकांकडून.आता हेच पहा ना! अभिनेत्री असो किंवा अभिनेता त्यांनी आपले चित्रपट सुपरहिट करण्यासाठी जिवाचे रान केले पण सगळ्यांना ते जमलेच असे नाही. काही जणांना 2014 हे वर्ष हे अगदीच अॅव्हरेज असे गेले. मात्र तरीही प्रसिद्धधीझोतात राहण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या पयार्यांचा अवलंब केला.मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी ( ज्युनिअर) यांनी चित्रपटांवरच कॉंस्नट्रेशन केले, पण मुक्ता बवेर्चा अपवाद वगळता या सगळ्या जणी सोशल नेटवर्किं ग साईटवर अधिक सक्रिय राहिल्या. स्वप्निल जोशी आणि अंकुश चौधरी यांनी 'ट्ट्विटर' स्वत:चा फँन गृप बनविला. तेजस्विनी पम्डित, सोनाली, प्रिया यांनी लाखाच्या घरात लाईक्सचा टप्पा पार केला. काही जणींची चित्रपटात डाळ शिजली नाही किंवा त्यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत त्यांनी चक्कपैकी प्रकाशझोतात राहण्यासाठी चित्रपटांमध्ये आयटम सॉंगचा पर्याय निवडला यामध्ये उल्लेख करावा लागेल तो नेहा पेंडसे आणि मानसी नाईक हिचा. मानसी नाईकने तीन ते चार चित्रपट यंदाच्या वर्षात केले पण बॉक्सआॅफिसवर ते समाधानकारक यश मिळवू शकले नसल्याने नृत्यावरच तिने वेळ मारून नेली. अमृता खानविलकरने चित्रपटांमधून काहीसा ब्रेक घेऊन 'नच बलिये 7' चा सिझन केला आणि विजेतेपदाचा मान मिळविला. त्यानंतर अमृता दिसली ती थेट 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटातच. जाहिराती हे देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते त्यामुळे काही मराठी अभिनेता-अभिनेत्रींनी आपला मोर्चा चक्क जाहिरातींकडे वळविला. स्वप्निल जोशीसह सोनाली कुलकर्णी, उर्मिला कानेटकर, आदिनाथ कोठारे हे चेहरे प्रेक्षकांच्या नजरेत राहाण्यासाठी जाहिरांतींमध्ये देखील झळकले. तर काहींनी रंगभूमीचा मार्ग स्वीकारला. स्पृहा जोशी 'बायोस्कोप' मधला 'एक होता काऊ' या कथेत आणि पेईंग घोस्ट चित्रपटात झळकली पण म्हणावी तेवढी त्याची त्तरीही चिन्मय मांडलेकरबरोबर 'समुद्र' हे नाटकांचे अनेक प्रयोग करीत तिने रंगभूमी गाजवली. उमेश कामत याचे 'पेईंग घोस्ट'' आणि 'बाळकडू' हे चित्रपट फारसे प्रभावी ठरले नाहीत पण तो सोशल मिडियावर अधिकच अँक्टिव्ह राहिला.क्रांती रेडकर, प्राजक्ता माळी यांनी आपला बोरियाबिस्तरा छोट्या पडद्याकडे वळविला, तर काही अभिनेत्रींनी विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये नृत्य सादरीकरणातून का होईना प्रकाशझोतात राहतात.