Join us

पूजा सावंतच्या घरी आले दोन नवीन पाहुणे, अभिनेत्री म्हणाली - 'भेटा आमच्या बंटी आणि बबलीला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:19 IST

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा साखरपुडा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा साखरपुडा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. तेव्हापासून ती चर्चेत आहे. दरम्यान आता तिच्या घरी दोन नवीन पाहुणे दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत तिने त्यांची ओळख करुन दिली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत प्राणी प्रेमी आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. आता तिच्या घरी दोन नवीन पाहुणे दाखल झाले आहेत. हे दोन पाहुणे म्हणजे कुत्र्याची दोन पिल्ले आहेत. तिने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, कुटुंबात नवीन सदस्यांचे स्वागत. दत्तक घ्या. विकत घेऊ नका. भेटा आमच्या बंटी आणि बबलीला. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या पोस्टवर सगळेजण तिचे खूप कौतुक करत आहेत. 

काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. सिद्धेश चव्हाण याला पूजा डेट करत असून लवकरच त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी पूजा गोव्याला व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. विशेष म्हणजे गोव्यामध्ये पूजाने बॅचलर पार्टीही केली. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या पूजाने तिच्या गोवा डायरीमधील काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. 

कोण आहे पूजाचा होणारा नवरा? पूजा सावंत पुढील वर्षी म्हणजेच २०२४मध्ये लग्नगाठ बांधणार आहे. तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण डिझ्नी कंपनीत असल्याच्या चर्चा आहेत. तसेच तो विदेशात राहतो या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल अद्याप काहीही समजू शकलेलं नाही.  वर्कफ्रंट...पूजा क्षणभर विश्रांती, झकास,दगडी चाळ, भेटली तू पुन्हा,लपाछपी पोश्टर बॉईज २ अशा कितीतरी मराठी सिनेमात झळकली आहे. तसंच तिने बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे.

 

टॅग्स :पूजा सावंत