Join us

यू टर्नचा ६०० वा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2016 10:59 AM

प्रत्येक कलाकारासाठी नाटक हा जिव्हाळयाचा विषय असतो. सध्या अनेक नाटक रंगभूमीवर सादर होताना पाहायला मिळत असतात. मात्र काही नाटक ...

प्रत्येक कलाकारासाठी नाटक हा जिव्हाळयाचा विषय असतो. सध्या अनेक नाटक रंगभूमीवर सादर होताना पाहायला मिळत असतात. मात्र काही नाटक पंचवीस ते तीस प्रयोगानंतर प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. अशा परिस्थितीत एखादे नाटक ६०० वा प्रयोग सादर करत असेल तर त्या नाटकाची लोकप्रियता लक्षात येण्यासारखी असते. असेच एक यू टर्न नाटक आपला ६०० वा प्रयोग सादर करण्यास सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे या नाटकाचा पुढील भाग अर्थात यू टर्न-२ असे दोन्ही प्रयोग एकाच दिवशी रंगणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक खास संधी असणार आहे. विविध पुरस्कारप्राप्त यू टर्न हे नाटक आहे. या नाटकाला गेल्या आठ वर्षांत नाटकाला २७ पुरस्कार व पारितोषिके मिळाली आहेत.  या नाटकाचे वैशिष्टय म्हणजे नाटकात फक्त दोन कलाकार आहेत. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन आनंद म्हसवेकर यांचे असून डॉ. गिरीश ओक आणि इला भाटे हे ज्येष्ठ कलाकार नाटकात आहेत. १७ डिसेंबर २००८ या दिवशी यू टर्न नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता. अवघ्या दोन कलाकारांच्या या नाटकाने मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग केले आहेत. मूळ नाटकाचे प्रयोग रंगमंचावर सुरू असतानाच नाटकाचा दुसरा भाग आता प्रेक्षकांसमोर येत आहे. यू टर्न आणि यू टर्न-२चे नाटयप्रयोग सलग एकाच दिवशी करण्याचा विचार असून यू टर्न-२चे स्वतंत्र प्रयोगही होणार आहेत. नाटकातील नायक-नायिका पुन्हा एकमेकांना भेटतात का? याचे उत्तर यू टर्न-२ मध्ये पाहायला मिळणार आहे. यू टर्न-२ साठी अभिनेता सचिन खेडेकर, नंदू गाडगीळ, मनोहर सोमण यांचा आवाज दुसºया भागास लाभला आहे. यू टर्नचा ६०० वा प्रयोग आणि यू टर्न-२चा शुभारंभ येत्या ११ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. जिव्हाळा आणि सुप्रिया प्रॉडक्शनने यांनी या नाटकाचे आयोजन केले आहे.