मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला आज 9 वर्षे झाले असतानाही आजही त्यांच्यातील केमिस्ट्री खूप भारी वाटते. प्रिया आणि उमेशने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एकमेकांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
उमेश कामतने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, लग्नाची नऊ वर्षे आणि त्याआधीच्याही अनेक वर्षांपासून तू तशीऽऽऽऽच आहेस. तू चिडतेस, तू भडकतेस, तू रुसतेस आणि त्याच्या खूऽऽप पटिने जीवही लावतेस. तुला अंदाजही नसेल, की या सगळ्यांतून तुझ्याही नकळत मी घडत असतो. अधिक चांगला माणूस होत असतो. आपलं हे नातं असंच घडण्याचं! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तर प्रियानेदेखील व्हिडिओ शेअर करत म्हटले की, नवरा म्हणून तू माझ्या सहनशक्तीची मर्यादा कायमच स्ट्रेच करत आला आहेस. विशेष करू मला त्रास देऊन मुद्दाम चिडायला लावणे आणि त्याचा आनंद घेणे. पण आपल्या दोघांना माहित आहे की तू खूऽऽप जास्त चांगला माणूस आहेस. (माझ्यापेक्षाही जास्त). कायम असेच राहूयात. लव्ह यू.
प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.
उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला. याची आठवण करत प्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, उमेशने लग्नासाठी फार वेळ घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते.
अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.