Join us  

लंडनमध्ये प्रिया बापटवरून उमेश कामतचं एका व्यक्तीसोबत जुंपलं भांडण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 1:46 PM

Priya Bapat And Umesh kamat : अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल. दरम्यान आता त्या दोघांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यात प्रिया बापटवरून उमेश कामत एका व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहे.

अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल. या दोघांची ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान आता त्या दोघांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल  होताना दिसत आहे. त्यात प्रिया बापटवरूनउमेश कामत एका व्यक्तीसोबत भांडताना दिसत आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत सध्या लंडनमध्ये आहेत. तिथे त्यांच्या जर तरची गोष्ट या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. तिथे फिरतानाचे व्हिडीओ आणि फोटो ते दोघे सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान आता एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात उमेश एका व्यक्तीसोबत प्रियावरून भांडत आहेत. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, प्रियाला थंडी वाजतेय म्हणून एका व्यक्तीने तिला स्वतःचे जॅकेट दिले. तितक्यात तिथे उमेश आला आणि प्रियाला खेचत म्हणाला की, ये मेरा है...मग तो व्यक्ती म्हणतो जॅकेट पकडून लेकीन ये तो मेरा है ना. यावरून ते दोघे भांडताना दिसत आहेत. 

खरेतर हा मजेशीर व्हिडीओ प्रियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. 

जर तर ची गोष्ट...सोनल प्रोडक्शन निर्मित, प्रिया बापट सादर करत असलेल्या जर तर ची गोष्ट या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांचे लेखन या नाटकाला लाभले आहे. नंदू कदम या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाच्या निमित्ताने तब्बल दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत ही जोडी रंगभूमीवर एकत्र आली आहे.  

    

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत