Join us

हृता अन् अजिंक्य झाले रोमँटिक; मनाला भुरळ पाडणारं 'कन्नी'मधील गाणं प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 16:27 IST

Kanni movie song: पहिल्यांदाच हृता आणि अजिंक्य राऊत यांचा रोमँटिक अंदाज या गाण्यात पाहायला मिळाला आहे.

मराठी कलाविश्वात सध्या अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या आणि कथानकांच्या सिनेमांची निर्मिती होत आहे. यामध्येच कन्नी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे (hruta durgule) आणि अजिंक्य राऊत (ajinkya raut) ही फ्रेश जोडी स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. यामध्येच या जोडीवर आधारित एक रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'कन्नी' हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. त्यातच सिनेमातील मन बावरे हे नवं कोरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातून अलगद प्रेमकथा उलगडली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भावना या गाण्यात सुंदररित्या मांडण्यात आल्या आहेत. 

"प्रत्येक गाण्यात एक कथा जोडलेली असते आणि काही गोष्टी त्या गाण्यातून व्यक्त होत असतात. तसेच हे गाणेही प्रेमभावना व्यक्त करणारे आहे. त्यामुळे कपल्सना हे गाणे नक्कीच आवडेल. आणि जे नाहीत त्यांना हे गाणे प्रेमात पाडेल. हळुवार, नजरेने खुलत जाणारे प्रेम या गाण्यातून दिसत आहे. या श्रवणीय गाण्याला संगीत टीमही उत्तम लाभली आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे हे वेगळ्या धाटणीचे आहे." असं सिनेमाचे दिग्दर्शक समीर जोशी म्हणाले.

अभय जोधपूरकर आणि किर्ती किल्लेदार यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं हे गाणं अमर ढेंबरे यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर संगीत विशाल शेळके यांचं आहे.  दरम्यान, या चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या 'कन्नी' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत. 

टॅग्स :सिनेमाऋता दूर्गुळेसेलिब्रिटी