रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी आहे. यात भरत जाधव, वैभव मांगले हे विनोदाचे दोन बादशाह प्रमुख भूमिकेत आहेत. हा एक धमाल विनोदी चित्रपट आहे. चित्रपटाच्या शूटिंगवेळी वैभव मांगले यांच्यासोबत घडलेला एक विनोदी किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
धोंडी चंम्प्या मध्ये म्हैस आणि रेडा हे देखील सिनेमाचे भाग आहेत. प्राण्यांसोबत काम करणं किती आव्हानात्मक असतं याचा एक गमतीदार किस्सा वैभव मांगलेंना सांगितला आहे. ते म्हणाले, ' तर शूटिंगसाठी आम्ही एक रेडा आम्ही बघितला होता पण तो कधी सेटवर थांबायचाच नाही, यायचाच नाही सेटवर. त्यानंतर आम्ही दुसरा रेडा बघितला. त्याने पहिले २ ते ३ दिवस चांगले शॉट दिले.पण तिसऱ्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक तो माझ्याबरोबर यायलाच तयार नव्हता. मग आमचे दिग्दर्शक ज्ञानेश म्हणाले, त्याच्या समोर जे अन्न आहे ते बाजूला कर. मी ते अन्न उचललं आणि त्याच क्षणी तो असा काही चिडला आणि माझ्या मागे लागला. दहा मिनिटं आम्ही सेटवर पळत होतो आणि बाकीचे मजा घेत होते बरं झालं मांगलेची अशी जिरली शेवटी मी व्हॅनिटी मध्ये शिरलो तेव्हा तो शांत झाला.'
रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत.