Join us

'अ‍ॅनिमल' चित्रपटावर वैभव मांगलेंचं मोठं विधान, पोस्ट शेअर करत म्हणाले…

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 3:50 PM

लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी संदीप रेड्डी वांगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटावर पोस्ट शेअर केली आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'अ‍ॅनिमल' या सिनेमाची हवा पाहायला मिळते. या सिनेमाने कमाईचे अनेक नवे रेकॉर्ड बनवले. समिक्षक तसेच प्रेक्षकांकडूनही या सिनेमाचे जोरदार कौतुक झाले. अशातच लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांनी संदीप रेड्डी वांगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

वैभव मांगले यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना सवाल केला आहे. त्यांनी लिहले,  ''अ‍ॅनिमल' आणि 'अल्फा मेल'  या दोन गोष्टींआडून अनेक गोष्टींचे समर्थन दिग्दर्शकाने केले आहे, जे खूप घातक आहे (उदा. हिंसा आणि लैंगिकता ) असे वाटते का ?'. अभिनेत्याने शेअर केलेल्या या पोस्टवर सध्या नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

एका युजरने लिहले, 'हो नक्कीच घातक आहे. खास करून नुकत्याच तारुण्यावस्थेत पदार्पण केलेल्या मुला-मुलींसाठी असे चित्रपट घातक आहेत. मला भीती वाटते उद्या कोणीही शाळेत बंदूक घेऊन येईल आणि खुलेआम गोळीबार करेल, अमेरिकेप्रमाणे'. तर एकाने सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला मान्यता कशी काय दिली, असा सवाल केला. तर 'अगदी बरोबर, नवीन पिढी यातून काय घेईल. अधोगती कडे चालले आहे सर्व', अशी कमेंट एका व्यक्ती केली. 

'अ‍ॅनिमल' रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला. या चित्रपटावर हिंसेचा प्रदर्शनाचा आरोप केला जात असून त्याला महिलाविरोधीही म्हटले जात आहे. अ‍ॅनिमल' १ डिसेंबरला रिलीज झाला आणि कोटी रुपयांचा आकडा पार केला. रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटातील बॉबी देओलच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. मात्र तृप्ती डिमरीने सर्वाधिक खळबळ उडवून दिली. तिच्या व्हायरल इंटिमेट सीननंतर ती 'नॅशनल क्रश' बनली आहे.

टॅग्स :वैभव मांगलेसेलिब्रिटीबॉलिवूडरणबीर कपूर