Join us

'गळणारं छत अन् उंदरांचा सुळसुळाट'; एकेकाळी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहायचा वैभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 15:25 IST

Vaibhav tattwadi: मुंबईत पावसाळा अनेकांना हवाहवासा वाटतो. पण, वैभवला पावसाळा आला की प्रचंड टेन्शन यायचं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी. उत्तम अभिनय आणि स्मार्ट पर्सनालिटी यांच्या जोरावर वैभवने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. आज वैभवने यश, संपत्ती, स्टारडम सारं काही मिळवलं आहे. परंतु, हे सारं मिळण्यापूर्वी वैभवने खूप स्ट्रगल केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने पावसाळ्यात त्याच्या घराची कशी वाईट अवस्था व्हायची हे सांगितलं.

"मुंबईचा पावसाळा तुम्हाला एक्स्ट्रीम इमोशन्स दाखवतो. मी पहिल्यांदा मुंबईत आलो आणि ज्या घरात राहत होतो ते घर खूप लहान होतं. त्या लहानशा घरात आम्ही तिघे मित्र रहायचो. पण, पावसाळा आला की आम्हाला टेन्शन यायचं.  कारण, एकतर घर लहान त्यात या घरात उंदीर वगैरे यायचे. जोरात पाऊस आला की छत गळायचं. त्यामुळे हा पावसाळा कधी जातोय असं मला वाटायचं. मात्र, ज्यावेळी तुम्ही वरच्या मजल्यावर शिफ्ट होता तेव्हा हाच पावसाळा तुम्हाला रोमॅण्टिक वाटायला लागतो", असं वैभव म्हणाला.

दरम्यान, वैभवने छोट्या पडद्यापासून त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर फक्त लढ म्हणा, सुराज्य, कॉफी आणि बरंच काही, हंटर, मि.अँड मिसेस सदाचारी, बाजीराव मस्तानी, गुलाबजाम २ अशा कितीतरी हिंदी, मराठी सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :वैभव तत्ववादीसेलिब्रिटीबॉलिवूडमराठी अभिनेतासिनेमाटेलिव्हिजन