Join us

ख्रिसमस सेलिब्रेट करताना दिसली वैदही परशुरामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 13:06 IST

सध्या सगळीकडे ख्रिसमसची धूम आहे. सेलिब्रेटी ही या ख्रिसमसच्या रंगात रंगले आहेत.

सध्या सगळीकडे ख्रिसमसची धूम आहे. सेलिब्रेटी ही या ख्रिसमसच्या रंगात रंगले आहेत. अभिनेत्री वैदेही परशुरामीने ख्रिसमस ट्री-सोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.

तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदेही परशुरामीच्याअभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.  

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.

रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती.

टॅग्स :वैदेही परशुरामी