वज्र चित्रपटाचा ट्रेलर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 5:46 PM
वज्र या आगामी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला अभिनेत्री मानसी नाईक मुजरा करताना दिसणार ...
वज्र या आगामी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला अभिनेत्री मानसी नाईक मुजरा करताना दिसणार आहे. मराठी चित्रपटांमध्ये आयटम साँग तर बरेच येतात. परंतू मुजरा हा जास्त दिसत नाही. आता याच मराठी चित्रपटामध्ये आपल्याला मानसीच्या कातिलाना अदा पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे संगीतकार चंद्रमोहन सांनी सांगितले की, या सिनेमात एकदमच तरुण कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सर्वच टिमच यातील यंग आहे. तरुण दिग्दर्शक, अभिनेते यांच्यासोबत काम करायचे म्हणजे त्या चित्रपटाचे संगीत देखील तरुणाईला आवडेल असेच असायला पाहिजे. हाच विचार करुन आम्ही चित्रपटाला एकदमच एनर्जेटीक संगीत देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात एकुण तीन गाणी आहेत. यातील एक मुजरा असणार आहे. मानसीने या मुजºयामध्ये एकदमच कमाल केली आहे. हा मुजरा देखील आम्ही वेगळ््या धाटणीने करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जास्तीत जास्त हिंदी शब्द टाकण्यात आले आहेत. '' गायिका श्रीपर्णा चटर्जी हिने गायलेले ' हाय-रब्बा हुस्न ये है, जलवा है ये, सारी रात का मकसद क्या है .... या गाण्यावर मानसी नाईक खास तिच्या अदांमध्ये मुजरा करताना पाहायला मिळणार आहे. मयूर करंबळीकर दिग्दर्शित या चित्रपटात ती खास मस्तानी स्टाईलने मुजरा करताना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे. या चित्रपटाचे निमार्ते शंतनु देशपांडे असून संगीतकार व गीतकार म्हणून चंद्रमोहन यांनी या चित्रपटासाठी काम केले आहे. तर मानसीसोबत अभिनेता राहूल सोलापूरकरचा अभिनय देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच या मुजराविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना मानसी म्हणाली, या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक बॉबी सय्यद आणि कैमेरामॅन यांनी खूप मेहनत घेतली आहे. माझे 'मुजरा नृत्य' म्हणजे मुजºयाच्या रूपात लावणी असून मराठी चित्रपटात हा प्रकार प्रथमच पाहायला मिळणार आहे. तसेच माझे गाणे म्हणजे 'मराठमोळी मस्तानी' दाखविण्याचा हा एक नवीन प्रयोग असून एक मराठमोळी मस्तानी तुमच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे असे समजा.