अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरचा नुकताच साखरपुडा पार पडला. आता हे दोघे लग्नबेडीत कधी अडकणार, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र मागील वर्षी व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. यंदाच्या व्हॅलेन्टाइन डेच्या निमित्ताने त्या दोघांनी साखरपुड्याच्या वेळचे अविस्मरणीय क्षण आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
सिद्धार्थ व मितालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्याच्या वेळीच्या अविस्मरणीय क्षण शेअर केले आहेत. सिद्धार्थने व्हिडिओ शेअर करीत लिहिले की असं घडलं सगळं. एक छोटीशी झलक. या व्हिडिओत त्या दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे.
तर मितालीने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत लिहिले की, नशीबाने भेटलो. तुझी मैत्रिण बनणे ही माझी पसंती होती. पण तुझ्या प्रेमात पडणे हे माझ्या संयमाच्या पलिकडे होते. हॅप्पी व्हॅलेंटाइन डे.
याच दरम्यान सिद्धार्थच्या आयुष्यात मितालीने एंट्री घेतली. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत गेल्याचे पाहाला मिळाले होते.