सध्या सर्वत्र बिग बॉस मराठी सीझन पाचचा (Bigg Boss Marathi Season 5) विजेता सूरज चव्हाण(Suraj Chavan)ची चर्चा आहे. त्याला कारणही तसे खास आहे. त्याचा केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित सिनेमा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यातील 'झापुक झुपूक' हे गाणं देखील चांगलंच हिट ठरले आहे. सध्या सोशल मीडियावर या गाण्यावरील रिल पाहायला मिळत आहे. दरम्यान आता या चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्यासाठी सूरज चव्हाण अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने वर्षा उसगावकर यांच्यासोबत 'झापुक झुपूक' गाण्यावर रिल बनवला, जो जोरदार व्हायरल झाला आहे.
रिल स्टार ते बिग बॉस असा प्रवास करणाऱ्या सूरज चव्हाणने इंस्टाग्रामवर वर्षा उसगावकर यांच्यासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते दोघे 'झापुक झुपूक' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. यावेळी वर्षा उसगावकर यांनी अफव्हाइट रंगाचा वन पीस परिधान केला आहे. यात त्या खूप सुंदर दिसत आहेत. तर सूरजने सिनेमाचे प्रमोशन करणारे शर्ट आणि ब्लॅक डेनिम परिधान केली आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
सूरजने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आपल्या महाराष्ट्राच्या सुपरडुपर टॉपच्या क्विन आणि बिग बॉसच्या घरातल्या माझ्या आई वर्षा उसगावकर ताई…! यांच्या सोबत झापुक झुपूकवर नाचलो….! व्हू..! जब्बर मजा आली…!!!! आज वर्षा ताईंच्या आईंना बी भेटलो, त्यांच्याकडून आशीर्वाद घेता आला, याचा खूप खूप आनंद आहे….! वर्षा ताई तुमच्या आणि आईंच्या आशिर्वादासाठी खूप खूप आभार. एप्रिलला अख्यांनी आपल्या जवळच्या थेटरात जाऊन झापुक झुपूक बघायचा…! - तुमचाच सूरज.
वर्षा उसगावकरांनी प्रेक्षकांना केली विनंतीया व्हिडीओत वर्षा उसगावकर म्हणाल्या की, नमस्कार मी वर्षा उसगावकर. माझ्यासोबत आहे नाव सांगायची गरज आहे का, सूरज चव्हाण. माझा बिग बॉसमधला साथीदार आणि बिग बॉसचा विजेता. सूरजचा 'झापुक झुपूक' नावाचा नवीन चित्रपट येतोय. जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे निर्मित-दिग्दर्शित असा हा 'झापुक झुपूक' चित्रपट तुमच्या भेटीला येतोय दिनांक २५ एप्रिल, २०२५ रोजी. या सिनेमाला तुम्ही भरभरुन प्रतिसाद द्यायचा आहे. सूरजने महाराष्ट्राचे नाव मोठे केलेले आहे. कारण तो बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता आहे आणि 'झापुक झुपूक'सुद्धा मोठा विनर असणार आहे, अशी मला तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आहे. तुम्ही मला निराश करणार नाही आहात मित्रांनो. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.