वसतिगृहात घालवलेले ते दिवस आणि जुन्या क्षणांना लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी ताजे केलं. शनिवारी (७ ऑक्टोंबर २०२३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप शनिवारी जल्लोषात झाला. या सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली होती. तेव्हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला भेट देत वर्षा उसगांवकर यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
"चाळीस वर्षापुर्वी गोव्यातून मराठवाडयात शिक्षणासाठी आले अन् महाराष्ट्रातील यशस्वी अभिनेत्री झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागाने माझ्यातील कलावंत घडला. या काळात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामुळे मी मराठवाडयाची अजन्म ऋणी राहील. नाटयशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ.स्मिता साबळे व विद्यार्थ्यांनी भेट दिलेली ’माहेरची साडी’ जतन करुन ठेवील", असे वर्षा ऊसगांवकर म्हणाल्या.
वर्षा उसगांवकर लोकप्रिय मराठमोळ्या दिग्गज अभिनेत्री. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. वर्षा उसगावकर यांनी मराठी सिनेसृष्टीत मोलाचं योगदान दिलं. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. ९०चा काळ गाजवणाऱ्या वर्षा सध्या छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्या स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहेत.