अभिनेता रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेला 'वेड' (Ved) हा मराठी चित्रपट गेल्या ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. या सिनेमाने ५० कोटी कमाईचा आकडा पार केला आहे. २१ दिवसानंतरही सिनेमा गर्दी खेचतोय. 'वेड'मध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh ) मुख्य भूमिकेत आहेत. रितेशसोबत आणखी एका चेहऱ्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा चेहरा म्हणजे अभिनेत्री जिया शंकरचा (Jiya Shankar ). चित्रपटात रितेश आणि जिनिलीया यांच्याबरोबरच अभिनेत्री जिया शंकर ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत जियाने रितेश आणि जिनिलियाबद्दल भरभरून बोलली. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तिने शेअर केला. एक जोडपं म्हणून रितेश व जिनिलिया कसे आहेत, याबद्दल ती बोलली.
काय म्हणाली जियारितेश आणि जिनिलिया पडद्यावर, सोशल मीडियावर जसे दिसतात, खऱ्या आयुष्यातही ते अगदी तसेच आहेत. दोघंही प्रचंड प्रेमळ आहे. दोघंही एकमेकांसोबत कमालीचे सुंदर दिसतात. दोघांच्या लग्नाला दोन दशकं उलटली तरी त्यांच्यातील प्रेम तसुभरही कमी झालेलं नाही. मी तर म्हणेल, त्यांच्याकडे पाहून आजच्या पिढीने काहीतरी शिकायला हवं. एक विवाहित पुरुष त्याच्या जोडीदाराला वा पत्नीला कशी वागणूक देतो हे रितेशकडून शिकण्यासारखं आहे. रितेश सेटवर महिलांना ज्या पद्धतीने वागवतो, ज्या पद्धतीने आदर देतो, तसं वातावरण अन्य कुठेही बघायला मिळत नाही. त्याच्या सेटवर सगळेच प्रचंड खुष असतात, असं जिया म्हणाली.
मी बरेच कलाकार नट पाहिले...चित्रपटसृष्टीतील काम करण्याच्या अनुभवाबद्दलही ती बोलली. ती म्हणाली, मी अनेक स्वार्थी कलाकार पाहिलेत. मी कोणाचंही नाव घेणार नाही, पण असे अनेक जण आहेत, जे कायम स्वतःच्या कामाकडे लक्ष देतात. त्यांना फक्त त्यांच्या कामाची पर्वा असते. समोरची व्यक्ती काय करतीये, याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. मीच बेस्ट दिसायला हवं, मीच बेस्ट काम करायला हवं, याकडेच त्यांचं लक्ष असतं, असंही ती म्हणाली.
कोण आहे जिया शंकरजिया हा हिंदी टेलिव्हिजन विश्व आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असून तिचा 'वेड' हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. जियाने 2013 मध्ये अजय मंथेना सोबत 'एंठा आंदंगा उन्नावे' या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नंतर 2017 मध्ये ती अरुण चिंदबरमसोबत 'कनावू वरियाम' या तामिळ चित्रपटात झळकली. 2015 मध्ये तिने बिंदास चॅनलवरील 'लव्ह बाय चान्स'मधून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले. 2016 मध्ये तिला अँड टीव्हीवरील 'क्वीन्स है हम'मध्ये मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली.'मेरी हानिकारक बिवी', 'काटेलाल अँड सन्स' या मालिकांमधून ती लोकप्रिय झाली. सध्या जिया कलर्स वाहिनीवरील पिशाचीनीमध्ये पवित्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.