Join us

Ved Marathi Movie Record : 'लय भारी' रेकॉर्ड!! रितेशच्या 'वेड'ने मराठी फिल्मच्या इतिहासात केला जबरदस्त पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 3:38 PM

'वेड'च्या लोकप्रियतेचा परिणाम पाहता या सिनेमाने आता रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

Ved Marathi Movie Record : महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलियाच्या (Genelia) 'वेड'ने  (Ved Marathi Movie) अक्षरश: नावाप्रमाणेच सर्वांना वेड लावलं आहे. 'वेड' हा मराठी सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला तरी याची लोकप्रियता वाढतच चालली आहे. रितेश जिनिलियाची क्युट जोडी, तुफान प्रमोशन आणि सुंदर गाणी यामुळे वेड प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतोय.

'वेड' ची रेकॉर्डब्रेक कामगिरी  

'वेड'च्या लोकप्रियतेचा परिणाम पाहता या सिनेमाने आता रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. काल ८ तारखेला रविवारी 'वेड'ने एका दिवसात तब्बल ५.७० कोटींची कमाई करत रेकॉर्ड केला आहे. एकाच दिवसात इतक्या कोटींचा गल्ला जमवणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. तर आतापर्यंत सिनेमाने एकूण 33.42 कोटींचा गल्ला जमवला आहे. रितेशने पोस्ट शेअर करत या रेकॉर्डची माहिती दिली आहे. 

वेड सिनेमाच्या या यशाने मराठी सिनेजगतच नाही तर बॉलिवूडही भारावून गेले आहे. वेड ला प्रेक्षकांनी दिलेले भरभरुन प्रेम पाहता सर्वत्र कौतुक होत आहे. रितेश आणि जिनिलियावर कौतुकांचा वर्षाव होतोय. सलग १० व्या दिवशीही सिनेमाची घौडदौड सुरुच आहे. वेड येत्या काही दिवसात आणखी विक्रम नावावर करेल असेच चित्र दिसतेय.

'वेड'ची बॉक्सऑफिसवरील कमाई 

Ved Marathi Movie : हिट है बॉस ! रितेश जिनिलियाच्या सुपरक्युट जोडीने पुणेकरांनाही लावले 'वेड', दोघांचा साधेपणा बघून पुणेकर भारावले

पहिल्या आठवड्याभरामध्ये या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.  चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 25 लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 4.50 कोटी, चौथ्या दिवशी 3.02 कोटी, पाचव्या दिवशी 2.65 कोटी, सहाव्या दिवशी 2.55 कोटी, सातव्या दिवशी 2.45 कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी 2.52 कोटींचा गल्ला जमवला. नवव्या दिवशी या सिनेमाने पहिल्या दिवशीपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे 5 कोटी आणि दहाव्या दिवशी 5.70 कोटींचा गल्ला जमवला आहे.  चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 33.42 कोटींची कमाई केली आहे.

रितेश-जिनिलियासह‘वेड’ या सिनेमात अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची  झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वेड या सिनेमातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे तर जिनिलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी चित्रपट