Join us

वीणा जामकरने दिली नव्या चित्रपटाबाबतची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 13:29 IST

अभिनेत्री वीणा जामकर लवकरच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे.

ठळक मुद्देवीणा जामकर सध्या करतेय सिनेमाचे चित्रीकरण

बरेच कलाकार सोशल मीडियावर सक्रीय झाले असून या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल, लूक बद्दल व विविध गोष्टींबद्दल सांगत असतात. तर काही कलाकार लाइव्ह येऊन थेट चाहत्यांशी संवाद देखील साधत असतात. मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री वीणा जामकर बऱ्याच कालावधीपासून रुपेरी पडद्यावर झळकताना दिसली नाही. मात्र लवकरच ती रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे. याबाबत माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे. 

वीणा जामकरने इंस्टाग्रामवर तिचा सेटवरील फोटो शेअर करून लिहिले की, आजपासून नवीन सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. खूप मोठा सेट आहे. अभिनय करण्यासाठी खूप उत्सुक झाले आहे. हळूहळू मी या सिनेमाची अपडेट देत राहीन. चित्रीकरणाचा पहिला दिवस. 

वीणा जामकरने आगामी चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे. अद्याप या सिनेमाबद्दलची जास्त माहिती समजू शकलेली नाही. या पोस्टसह वीणाने राही अनिल बर्वेला टॅग केले आहे. राही अनिल बर्वे गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत राहिला आहे. कारण गेल्या महिन्यात त्याने दिग्दर्शित केलेला बहुचर्चित तुंबाड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला व समीक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली होती. आता तो कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत.

वीणा जामकर गेल्या वर्षी लालबागची राणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती आणि या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले होते.  वीणा जामकरने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत. पण ती पहिल्यांदाच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. ती रमाई या चित्रपटात रमाबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

टॅग्स :वीणा जामकर