Join us

Shrikant Moghe : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 9:26 PM

Shrikant Moghe : वाऱ्यावरची वरात नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे.

पुणे - ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं (Shrikant Moghe) निधन झालं आहे. वाऱ्यावरची वरात नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिनेता शंतनू मोघे आणि प्रिया मराठे असा परिवार आहे. श्रीकांत मोघे यांनी साठहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. ’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.

श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बीएस्‌‍सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.

टॅग्स :मराठीसिनेमा