Join us  

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशींना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर, नाट्यक्षेत्रातील मोठा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 2:00 PM

ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशींना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झालाय (suhas joshi)

'प्रपंच', 'कुंकू' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशींना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्यक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार सुहास जोशींना देण्यात आलाय. सुहास जोशींच्या आजवरच्या कारकीर्दीचा हा मोठा सन्मान म्हणता येईल. येत्या ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सुहास जोशींना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सुहास जोशींचा विष्णुदास भावे पुरस्काराने होणार सन्मान

सुहास जोशींचा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.  २५ लाखांची रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिनाचं औचित्य साधून सुहास जोशींचा हा खास सन्मान करण्यात येणार आहे. सुहास जोशी गेली अनेक वर्ष विविध नाटक, सिनेमा, मालिकांमधून आपल्याला दिसत आहेत. सुहास जोशींच्या चाहत्यांना यामुळे खूप आनंद झालाय.

सुहास जोशींची कारकिर्द

सुहास जोशी काहीच महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'मुंज्या' या हिंदी सिनेमात दिसल्या. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'एकदा काय झालं' सिनेमात सुहास जोशी झळकल्या. सुहास जोशींनी १९७२ साली विजया मेहता दिग्दर्शित 'बॅरिस्टर' नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. पुढे 'घरोघरी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा', 'नटसम्राट', 'कन्यादान', 'अग्निपंख', 'कथा' अशा विविध नाटकात त्यांनी अभिनय केला. सुहास जोशींना मिळणारा विष्णुदास भावे पुरस्कार हा त्यांच्या रंगभूमीवरील समृद्ध कारकीर्दीचा गौरव आहे.

टॅग्स :मराठीमराठी अभिनेता