Join us

'गेला माधव कुणीकडे' फेम ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 16:12 IST

Madhavi gogate: वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात माधवी गोगटे यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  'भ्रमाचा भोपळा', 'गेला माधव कुणीकडे' ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. या नाटकांप्रमाणेच 'घनचक्कर' या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. विशेष म्हणजे त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं होतं.

माधवी गोगटे यांच्या हिंदी मालिका

'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' या हिंदी मालिकेत झळकल्या. सोबतच “तुझं माझं जमतंय'' या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.  दरम्यान, माधवी यांच्या पश्चात त्यांचे पती आणि विवाहित मुलगी असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूडटिव्ही कलाकार