Join us

Video : 'माझा पती करोडपती'मधील सचिन पिळगांवकर व अशोक सराफ यांचा धमाल सीन पाहून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 6:05 PM

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या 'माझा पती करोडपती' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या 'माझा पती करोडपती' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने प्रेक्षक वर्ग पाहतो. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर व किशोरी शहाणे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. या चित्रपटातील एक धमाल सीन झी टॉकिजने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल.

झी टॉकिजने शेअर केलेल्या माझा पती करोडपती चित्रपटातील सीनमध्ये सचिन पिळगांवकर व अशोक सराफ एका हॉटेलमध्ये बसलेले आहेत. आणि नरेन (सचिन पिळगांवकर) कॅप्टन (अशोक सराफ)ना काय खाणार विचारून बायकोला सोडायचे काय घ्याल असे विचारतो. त्यावर कॅप्टन राईस प्लेट असे म्हणतो. त्यावर नरेन कॅप्टनना मला तुमच्या बायकोशी लग्न करायचे आहे. तिला घटस्फोट देण्यासाठी काय घ्याल असे विचारतो. त्यावर कॅप्टन घटस्फोट देणार नाही असे सांगतो. एक लाख रुपये द्यायला नरेन तयार होतो. पण कॅप्टन नरेनवरच वैतागतो आणि मी हे सगळे हेमा नाही प्रेमासाठी करतो आहे, असे सांगतो.  त्या दोघांचे बोलणे सुरू असताना हेमा येते आणि हेमाला पाहून कॅप्टन तिथून पळ काढतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप मजा येईल.

 

'माझा पती करोडपती' चित्रपटाची कथा शंकू व नरेनवर आधारीत आहे. शंकू गरीब असते पण ती श्रीमंत नरेनला भुरळ पाडत त्याच्याशी लग्न करण्याची योजना आखते. त्यात ती विधवा असल्याचे नाटक करते आणि ती तिच्या मेलेल्या नवऱ्याचे फोटो दाखवते तोच व्यक्ती तिच्यासमोर येऊन उभा ठाकतो. त्यानंतर ती पेच प्रसंगात सापडते तर दुसरीकडे नरेन तिला मिळवण्यासाठी तिच्या खोट्या नवऱ्याला मनवण्याचा प्रयत्न करतो.

टॅग्स :सचिन पिळगांवकरअशोक सराफ