Join us

VIDEO : लंडनमध्ये सोनाली कुलकर्णी अन् हेमंत ढोमेचा 'जरासा झुमलु मै' गाण्यावर डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 15:35 IST

सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लंडनमध्ये शूटिंग करतेय.

सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लंडनमध्ये शूटिंग करतेय. या शूटिंग दरम्यानच्या मजा मस्तीचे व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेयत. आणि यात तिने शेअर केलेला एक फोटो सध्या चांगलाच वायरल होतोय. या फोटोची खूपच चर्चा होतेय.या व्हिडीओत सोनाली अभिनेता हेमंत ढोमेसोबत जरासा झुमलु मै या काजोल आणि शाहरुख खानच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये सोनाली आणि हेमंतचा कोल्ड रोमान्स पाहायाला मिळाला.

सोनालीने लंडनमधील हमेंतसोबतचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटोसुद्धा शेअर केले आहेत. सोनाली आणि हेमंत नक्की थ्री चिअर्स टू अस या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये गेले आहेत. लोकेश गुप्तेचा दिग्दर्शन असलेला हा तिसरा चित्रपट आहे.

सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती धुरळा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमेय वाघ, अंकुश चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

हा चित्रपट राजकारणावर आधारीत असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या सोनाली डान्सिंग क्वीन या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी