Join us

VIDEO : मुंबई सोडून शेतीत रमली ही प्रसिद्ध अभिनेत्री! अभिनयासह नवऱ्यासोबत करतेय शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 14:03 IST

मराठमोळ्या अभिनेत्रीने शेतातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे.

सध्या कलाकार अभिनयासोबत जोड व्यवसाय करताना दिसत आहे. मग कुणी साड्यांचा बिझनेस करतंय तर कुणी दागिन्यांचा. तर कुणी हॉटेल सुरू केलंय तर कुणी अभिनय शाळा चालवतंय. मात्र मराठी कलाविश्वातील एक अभिनेत्री मुंबई सोडून ऑर्गेनिक शेती करतेय. ही अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande). ती सध्या नवऱ्यासोबत महाबळेश्वरमध्ये राहत आहे आणि तिथे शेती करतेय. नुकताच तिने त्यांच्या शेतातला एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती शेतात वांगी तोडताना दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी माझ्या शेतातून काही ताज्या भाज्या तोडल्या! तुमचे अन्न नेमके कुठून येते हे जाणून घेण्यापेक्षा चांगले काहीही नाही. 

मृण्मयीच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. यापूर्वीही अनेकदा तिने सोशल मीडियावर शेतातील व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर मृण्मयीने तिच्या नवऱ्यासोबत शेती करू इच्छित असणाऱ्या तरुणांसाठी त्यासंबंधीत कोर्सचं आयोजनदेखील केले होते. शेतीसोबत मृण्मयीने नवा व्यवसायदेखील सुरू केला आहे. मृण्मयी आणि स्वप्नीलने निल अँड मोमो या नावाने हॅण्डमेड आणि ऑर्गेनिक साबणाचा व्यवसाय सुरू केलाय.   वर्कफ्रंटमृण्मयी देशपांडे शेवटची अॅमेझॉन प्राइमवर मुंबई डायरीज २६/११ मध्ये काम करताना दिसली. यात तिने डॉक्टर सुजाताची भूमिका साकारली आहे. ती स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडे