Join us

Mangalayam!!! शिवानी- विराजसच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ; पाहा या जोडीचं विधीवत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:54 IST

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: या व्हिडीओमध्ये विराजस-शिवानीच्या एन्ट्रीपासून ते लग्नातील सगळ्या विधींपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्यात आली आहे.

बॉलिवूडनंतर आता मराठी कलाविश्वातही लग्नसराईचे वारे वाहू लागले आहेत. लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या जोडीनंतर आता लोकप्रिय अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या जोडीनेही मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत या जोडीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा केला. मात्र, त्यांचं लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र, या सगळ्यांमध्ये शिवानीने अलिकडेच शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

लग्न झाल्यानंतर काही वेळातच शिवानीने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली. यामध्ये नुकताच तिने एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा संपूर्ण लग्नसोहळा शॉर्टमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक प्रकारची पर्वणीच आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये विराजस-शिवानीच्या एन्ट्रीपासून ते लग्नातील सगळ्या विधींपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्यात आली आहे. शिवानी आणि विराजस यांचं लव्ह मॅरेज असून जवळपास ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने लग्नगाठ बांधली.

टॅग्स :विराजस कुलकर्णीशिवानी रांगोळेसेलिब्रिटीसिनेमा