नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमात मुक्तपणे वावर करणारे लोकप्रिय अभिनेता म्हणजे वैभव मांगले (Vaibhav Mangale). आपल्या अभिनय कौशल्याने त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनयाव्यतिरिक्त वैभव मांगले सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच वैभव मांगलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
वैभव मांगलेने २१ वर्षांपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत लिहिले की, 21 वर्षा पूर्वी मी ....... वक्त वक्त की बात होती हैं भैया ..... या फोटोत वैभव मागले खूपच वेगळा दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर काही युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रियाएका युजरने या पोस्टवर कमेंटमध्ये लिहिले की, दादा काय आहे आहे ..... शाकाल असा होता .....? पण काय पण म्हण स्मार्ट दिसतोय .... असा शाकाल असेल तर कोणच घाबरणार नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, गेलेला काळ, गेलेले लोक आणि गेलेले केस.. फ़िर नही आते.. फ़िर नही आते.. आणखी एका युजर्सने म्हटले की, आपले जुने पैसा फंड शाळेतले दिवस आठवले.. त्या वेळी मी ७वी८वीत असेन.. तुम्ही ११ वीला होता बहुतेक... त्यावेळेस तुम्हाला असे पाहिल्याचे आठवते...तुम्ही त्या ही वेळेस वर्गात पोहचेपर्यंत गाणी म्हणत असायचात.
वर्कफ्रंटबद्दल...वैभव मांगले यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी २००४ साली 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 'टाइमपास' मधील त्यांची भूमिका कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त मांगलेने एक गाव भुताचा, मालवणी डेज, माझे पती सौभाग्यवती आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मालिकेतही काम केले आहे.