अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि लहानांपासून वयोवृद्धांंपर्यंत आकर्षण असणारा सर्वांचा लाडका बाप्पा गणपती याच्यावर पहिल्यांदा वेब सीरिज येत आहे. यात गणपती बाप्पाचा जीवनपट तसेच काळानुसार बापाच्या उत्सवाचे बदलते स्वरूप, इतिहास, सखोलपणे माहिती या वेब सिरीजमधून मांडण्यात आली आहे. पुण्यातील नामवंत संकल्प डिझाइन्सने या वेब सीरिजद्वारे डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले आहे.
गेल्या सात वर्षांपासून www.puneganeshfestival.com च्या माध्यमातून पुण्यातील गणपती उत्सवाविषयक प्रत्येक माहिती, अपडेट, छायाचित्रे - चलचित्रे आणि रंजक माहिती संकल्प सातत्याने देत आले आहे. पुण्यातील व महाराष्ट्रातील गणेश उत्सव, त्याची महती, उत्सवाची परंपरा हा सातासमुद्रापार पोहचावा हाच त्याचा उद्देश असून त्याचाच एक भाग म्हणून संकल्पने "पुणेरी बाप्पा" ही माहितीपर वेब सीरिज रसिकांसाठी आणली आहे. इको फ्रेंडली बाप्पा मुख्यत्वे १२५ वर्षाच्या गणेश उत्सव, कालानुरूप गणेश उत्सव कसा बदलत गेला, गणपती स्थापनेचा इतिहास असे अनेक बारकावे यातून रसिकांना पहायला मिळतील. या माध्यमातून प्रत्येक अपडेट जगात पोहचवण्यासाठी संकल्प डिझाइन्सची टीम काम करत आहे. यु ट्यूबवर "पुणे गणेश फेस्टिव्हल" या नावाने असलेल्या चॅनेलवर "पुणेरी बाप्पा" या वेब सीरिजचे भाग रसिकांना पाहवयास मिळणार आहेत. बाप्पाची महती जाणून घेण्यासाठी गणपती बाप्पा ही वेब सीरिज नक्कीच पाहावी लागेल.