Join us

बाल गुन्हेगारीचे कोणते पैलू उलगडणार रुपेरी प़डद्यावर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2016 3:26 PM

 बऱ्याचदा, समाजातील काही मुलांवर, समाजाने ‘वाया गेलेली मुलं’ असा शिक्का मारलेला असतो. मग त्या मुलांची मानसिकताच बनते, ह्या मुलांचे ...

 बऱ्याचदा, समाजातील काही मुलांवर, समाजाने ‘वाया गेलेली मुलं’ असा शिक्का मारलेला असतो. मग त्या मुलांची मानसिकताच बनते, ह्या मुलांचे प्रतिकूल ‘फॅमिली बॅकग्राउंड’ त्यांच्या या वागणुकीला कारणीभूत ठरत असते. या दुष्टचक्रात अडकलेल्या मुलांमधूनच पुढे गुन्हेगार निर्माण होतात. या मुलांमध्ये बदल घडवायचा असेल तर आधी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाची मानसिकता ही महत्त्वाची असते. ओली की सुकी या चित्रपटाच्या माध्यमातून लहान वयात गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मुलांची कथा मांडण्यात आली आहे.  समाजाची मानसिकता बदलण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम असल्याचे या चित्रपटाचे लेखक आनंद गोखले यांना वाटते. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘वस्तीतील वास्तव’ या धाग्यावर जरी चित्रपट बेतला असला तरी ते वास्तव कुठेही अंगावर न येता उलट प्रेक्षक, या चित्रपटाशी आपोआप कनेक्ट होतील असा विश्वास लेखकाला आहे. तेजश्री प्रधान  भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर जवळ जवळ १०-१२  बालकलाकारांचादेखील या चित्रपटात समावेश आहे. एवढे बालकलाकार असलेल्या या चित्रपटात अजूनही खूप गमती जमती आहेत. हा चित्रपट बघणे म्हणजे एक भन्नाट अनुभव असणार आहे हे खरं !  मात्र हा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत म्हणजे १६ डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे हे नक्की. तसेच या चित्रपटाची पटकथा आमि दिग्दर्शन आनंद गोखले यांनी केले आहे तर वैभव उत्तमराव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.