बंगळुर घटनेवर काय म्हणाल्या या अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 5:35 PM
बंगळुरुमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडलेल्या महिला आणि तरुणींसोबत गदीर्चा फायदा घेत मद्यधूंद अवस्थेत फिरणा?्या टवाळखोरांनी असभ्य वर्तन केल्याचे समोर ...
बंगळुरुमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडलेल्या महिला आणि तरुणींसोबत गदीर्चा फायदा घेत मद्यधूंद अवस्थेत फिरणा?्या टवाळखोरांनी असभ्य वर्तन केल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर पूर्व बंगळुरुमधील कम्मनहालीमध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी एका महिलेचा विनयभंग केल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. या घटनेची सर्व स्थरावर निंदा करण्यात आली होती. बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल तिखट प्रतिक्रिया मांडल्या होत्या. मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि क्रांती रेडकर यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुलींच्या छोट्या कपड्यांबद्दल त्यांच्यावर बोट ठेवले जात होते याबद्दल एका मुलाखतीत बोलताना उर्मिलाने यावेळी आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली की, बंगळुरुमध्ये जी घटना झाली त्यात मुलीने तोकडे कपडे घातले नव्हते. मुला मुलींना लहानपणापासूनच अशा पद्धतीने वाढवलं जातं मुलं मुली वेगवेगळ्या शाळेत शिकतात त्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना एकमेकांबद्दल अधिक कुतुहल वाटायला लागतं. यासाठी लहानपणापासूनच मुला-मुलींना एकमेकांसोबत बोलायला खेळायला दिलं तर ते कुतुहल कमी होतं. तसंच तोकडे कपडे घालण्यावर माझा अजिबात आक्षेप नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही तोकडे कपडे घालता तेव्हा ते कुठे घालता याचे भान ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या परिसरात असे कपडे वापरता, तिथल्या लोकांची तुम्हाला छोट्या कपड्यात स्वीकारण्याची मानसिकता आहे का याचाही विचार करणे आवश्यक आहे. खरंच आहे म्हणा, मुलींच्या कपड्यांविषयी कमेंट्स करण्यापेक्षा आपली मानसिकता सुधारायला हवी. या घटनेचा अनेक कलाकारांना सोशलसाईट्सवर तीव्र संताप व्यक्त करीत निषेध केला आहे.