काय म्हणाला नागराज मराठी प्रेक्षकांबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2016 9:26 AM
नुकत्याच एका हिंदी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नागराजला केवळ मराठीतच चित्रपट बनवणार का हिंदीतही येणार असे विचारले असता तो म्हणाला, ...
नुकत्याच एका हिंदी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नागराजला केवळ मराठीतच चित्रपट बनवणार का हिंदीतही येणार असे विचारले असता तो म्हणाला, ‘अद्याप असे काही ठरलेले नाही. मला हिंदीच्या स्टाईलचे चित्रपट करायचे नाहीयेत. मला मराठी माहिती आहे त्यामुळे सध्या तिथेच लक्ष केंद्रित केलेय.’ नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेला सैराट सध्या १०० कोटीच्या क्लबकडे वाटचाल करीत आहे. मराठी चाहत्यांसोबतच हिंदी तसेच अनेक इंग्लिश चाहत्यांनाही या चित्रपटाला डोक्यावर धरले आहे. यादरम्यान नागराजने मराठी प्रेक्षकांबद्दलचेही मत व्यक्त केले. मराठी चित्रपटांचा साचा जसजसा बदलतोय तसा प्रेक्षकवर्गही बदलतोय. मराठी प्रेक्षक हा प्रगल्भ आहे. ते चित्रपटातील कॅरेक्टर पाहत नाहीत तर ते कहाणी बघतात. चित्रपटाची कथा हेच त्या चित्रपटाचे मूळ असते आणि तेच मराठी प्रेक्षकांना भावतेय. त्यामुळेच फँड्री, एलिझाबेथ एकादशी, सैराट या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलीय, असे नागराज म्हणाला.