Join us

स्पृहाला लहानपणी काय बनायचे होते?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2016 11:31 AM

प्रत्येकाचे लहानपणीचे एक स्वप्न असते. शाळेत कोणी विचारले की, तूला मोठेपणी काय बनायचे आहे तर कोणी म्हणायचे, डॉक्टर, अभिनेत्री, ...

प्रत्येकाचे लहानपणीचे एक स्वप्न असते. शाळेत कोणी विचारले की, तूला मोठेपणी काय बनायचे आहे तर कोणी म्हणायचे, डॉक्टर, अभिनेत्री, पोलिस, कलेक्टर अशा विविध मोठया पदाचे नाव सांगायचे. मात्र प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणायची मला कंडक्टर बनायचे आहे. नुकतेच तिने चाहत्यांसह  ट्विटरकट्टावर मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्यांने तिला विचारले तूला बालपणी काय होण्याची इच्छा होती? त्यावेळी स्पृहाने तिच्या या स्वप्नांचा उलगडा चाहत्यांसमोर केला आहे. त्यांच्या या गप्पा टप्पा ट्वििटरवर चांगलाच रंगला होता. यावेळी स्पृहा म्हणाली की, मला बालवयात असताना बस कंडक्टर बनण्याची इच्छा होती.  तसेच, स्पृहाला स्वत:च्या स्वभावातली न आवडणारी गोष्ट म्हणजे तिला माणसं अजिबात ओळखता येत नाहीत. ती लगेच कोणावरही विश्वास ठेवते असे तिचे म्हणणे आहे. आत्ताच्या पिढीतल्या कुठल्या बॉलीवूड हीरो बरोबर तुला काम करायला आवडेल? त्यावर तिने रणबीर कपूर असे उत्तर दिले. असे अनेक प्रश्न स्पृहाला ट्विटरकरांनी विचारले आणि स्पृहानेही त्याच उत्साहाने सर्वांना उत्तरे दिली. आता, स्पृहा जोशी आणि तेजस्विनी पंडित लवकरच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. स्पृहा आणि तेजस्विनी या दोघींचीही खूप आधीपासून मैत्री आहे. मात्र त्यांनी अद्यापपर्यंत एकत्र एकाही चित्रपटात काम केले नव्हते. पण त्यांना आता ही संधी मिळाली असून लवकरच त्या एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. देवा असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता अकुंश चौधरीदेखील झळकणार आहे. हा चित्रपट साऊथचा रिमेक असल्याचे समजत आहे.