Join us

"संसारातील मज्जा टिकवायला,आणि काय हवं?", प्रिया-उमेशचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:52 IST

Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

मराठी सिनेविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे प्रिया बापट (priya bapat) आणि उमेश कामत (umesh kamat). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर या जोडीने मराठी कलाविश्वात त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच पडद्यावर त्यांच्या केमिस्ट्रीला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तितकीच ऑफस्क्रीनदेखील ही जोडी लोकप्रिय आहे. दरम्यान नुकतेच प्रियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्रिया बापट हिने इंस्टाग्रामवर उमेश कामत सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, प्रिया बापट उमेशला फोटो काढायला सांगते. तिथे प्रिया फोटोसाठी पोझ देत आहे. तर उमेश फोटो क्लिक करताना दिसतो आहे. नंतर प्रिया त्याला फोटो दाखवायला सांगते तेव्हा कळतं की उमेशने प्रियाचे नाही तर स्वतःचे फोटो काढले आहेत. या व्हिडीओत एक दोन तीन चार चित्रपटातील गुगली हे गाणे वापरण्यात आले आहे. त्यांच्या या मजेशीर व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

प्रियाने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, संसारातील मज्जा टिकवायला,आणि काय हवं ? या व्हिडीओवर नेटकरीसह सेलिब्रेटीदेखील कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. निपुण धर्मांधिकारीने लिहिले की, पण चांगले आलेत फोटो. दिग्दर्शक वरूण नार्वेकरने म्हटले, माझे जुई साकेत. एका युजरने लिहिले की, अजून काय पाहिजे. उमेश फोटो छान येतात हा. दुसऱ्या युजरने म्हटले की, दोघांनाही मोठा ट्रक भरून प्रेम.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामत