Join us

​संत्याच्या "चिठ्ठी"चा काय झाला घोळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 3:55 AM

प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांतून स्वत:ची छाप पाडलेला अभिनेता शुभंकर एकबोटे चिठ्ठी या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटात ...

प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांतून स्वत:ची छाप पाडलेला अभिनेता शुभंकर एकबोटे चिठ्ठी या चित्रपटातून पहिल्यांदाच प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटात तो संत्या ही भूमिका साकारत असून, त्याच्या "चिठ्ठी"चा काय घोळ झाला याचं उत्तर आपल्याला १९ जानेवारीला मिळणार आहे. डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वैभव डांगे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. एक तरूण त्याच्या प्रेयसीला चिठ्ठी पाठवतो. मात्र, ती त्याला मिळतच नाही. त्यानंतर गावात काय गोंधळ उडतो त्याचं धमाल चित्रण या चित्रपटात  आपल्याला पहायला मिळणार आहे.शुभंकर एकबोटेने याने याआधी काही चित्रपटातही लहान भूमिका साकारल्या आहेत.  'चिठ्ठी हा चित्रपट म्हणजे ९०च्या दशकातल्या वातावरणाचं नेमकं चित्रण आहे. या चित्रपटानं तरूणाई नक्कीच नॉस्टेल्जिक होईल. साधं आणि मनोरंजक असं हे कथानक आहे. संत्या भूमिका साकारण्याचा अनुभवही उत्तम होता,' असं शुभंकरनं सांगितलं. "चिठ्ठी" हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून वैभव डांगे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. या पूर्वी धनश्रीनं काही चित्रपटांतून काम केलं आहे  मात्र या चित्रपटात ९०च्या दशकातली एक धमाल प्रेमकथा पहायला मिळणार आहे.  "चिठ्ठी" या चित्रपटातील माझी भूमिका अत्यंत साधी, 'गर्ल नेक्स्ट डोअर' अशी आहे. प्रियकरानं पाठवलेली "चिठ्ठी" तिच्यापर्यंत पोहोचतच नाही आणि काय धमाल उडते असं यातलं कथानक आहे. प्रत्येक प्रेक्षकाला ते नक्की आवडेल. मलाही या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे,' अशी भावना धनश्रीनं व्यक्त केली. आता या "चिठ्ठी"चा नेमका काय घोळ झाला आहे ते १९ जानेवारीलाच उलगडेल. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनीची भूमिका धनश्री काडगांवकरने साकारली आहे.या मालिकेमुळे धनश्री काडगांवकरला चांगलीच लोकप्रियता मिळाल्याचे पाहयाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत.