Join us  

भूषण-अनुषाचं चाललंय तरी काय? भर कार्यक्रमात अभिनेत्याच्या आईवडिलांच्या पडली पाया, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 1:18 PM

Bhushan Pradhan-Anusha Dandekar : भूषणचा आगामी सिनेमा घरत गणपतीच्या एका कार्यक्रमात अनुषा दांडेकर चक्क अभिनेत्याच्या आई वडिलांच्या पाया पडताना दिसली आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. खरेतर तो अनुषा दांडेकर(Anusha Dandekar)ला डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अलिकडेच त्या दोघांनी 'जुनं फर्निचर' या सिनेमात पती पत्नीची भूमिका केली होती. तेव्हापासून ते दोघे चर्चेत आहेत. मात्र आता सिनेमा रिलीज होऊन बराच काळ उलटल्यानंतर भूषणने शेअर केलेल्या पोस्टमुळे ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता भूषणचा आगामी सिनेमा 'घरत गणपती'(Gharat Ganpati Movie)च्या एका कार्यक्रमात अनुषा दांडेकर चक्क अभिनेत्याच्या आई वडिलांच्या पाया पडताना दिसली आणि तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

अभिनेता भूषण प्रधान लवकरच घरत गणपती या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरला अभिनेत्री अनुषा दांडेकरही उपस्थित होती. यावेळी तिने भूषणच्या आई वडिलांना पाहिले आणि त्याच्या आईला मिठी मारत त्यांच्या पायाही पडली. त्यानंतर मागे उभे असलेल्या भूषणच्या वडिलांच्याही पाया पडली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी ते नात्यात असल्याचे बोलत आहेत.

तसेच 'घरत गणपती'च्या टीमने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. त्यावेळी भूषणला त्याच्या रिअल लाईफ केमिस्ट्रीबद्दल विचारण्यात आले. 'घरत गणपतीमध्ये तुझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री गाजतीये. पण सोशल मीडियावर तुझी आणखी एक केमिस्ट्री चर्चेत आहे. याबद्दल चाहत्यांना काय सांगशील? यावर तो लाजतच 'थँक्यू' म्हणाला. नंतर त्याने सिनेमातला लोकप्रिय 'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस' हा डायलॉगही ऐकवला. नंतर सावरासावर करत भूषण म्हणाला, "आज घरत गणपतीसाठी आपण आलोय. ही सुद्धा केमिस्ट्री खूप गाजतेय."  अभिनेत्याने थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी त्याच्या लाजण्यातच सगळं काही आलं. 

टॅग्स :भुषण प्रधानअनुषा दांडेकर