सध्या प्रत्येकाचे आयुष्य हे खूप धकाधकीचे झाले आहे. आज प्रत्येक माणूस हा पैशाच्यामागे धावत आहे. त्याला स्वत:कडे ही पाहायला वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे. पण यातून जर थोडासा वेळ मिळाला तर आपण सगळेच एखादी ट्रिप नक्कीच करुन येतो. मग यात कलाकारदेखील कुठे मागे असतील. आता हेच पाहा ना, अभिनेता भूषण पाटील देखील सुट्टी मिळताच न्यूयॉर्कमध्ये जाऊन धमाल करून आला आहे. त्याच्या या न्यूयॉर्क ट्रिपविषयी लोकमत सीएनएक्सला भूषण सांगतो, आपण रोजच काम करत असतो. काम करताना आपण स्वत:ला मात्र विसरून जात असतो. आपल्या आपल्याकडेच लक्ष देत नाही. म्हणून रोजच्या कामातून थोडा वेळ मिळताच, मी न्यूयॉर्क ट्रिपचा विचार केला. या ट्रिपमध्ये खूप मजा आली. शॉपिंग, खाणे-पिण्याचा मनसोक्तपणे आनंद लुटला. तसेच स्वत:सोबतदेखील वेळ घालविण्याची संधीदेखील मला या ट्रिपच्या निमित्ताने मिळाली. या ट्रिपमुळे खरेच काम करण्यासाठी पुन्हा एकदा माझ्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची ताकद मिळाली. त्याचबरोबर मी माझे आगामी चित्रपट करण्यासाठीदेखील पूर्ण आत्मविश्वासाने सज्ज झालो आहे. भूषण यापूर्वी बर्नी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत तेजस्विनी लोणारी देखील दिसली होती. तसेच आता भूषणकडे दोन चित्रपट असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले आहे.
काय केल्यामुळे भूषणचा वाढतो आत्मविश्वास ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2016 5:56 PM