Join us

"जेव्हा पैशांचा प्रश्न येतो, तेव्हा लोक..."; पैसे थकवल्यामुळे संतापली गौतमी देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:50 IST

Gautami Deshpande : गौतमी देशपांडे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला तिच्या कामाचे पैसे तीन-चार महिने उलटूनही न मिळाल्यामुळे ती संतापली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सख्ख्या बहिणी मृण्मयी देशपांडे-गौतमी देशपांडे (Mrunmayee Deshpande-Gautami Deshpande) बऱ्याचदा सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत येत असतात. मात्र आता गौतमी देशपांडे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला तिच्या कामाचे पैसे तीन-चार महिने उलटूनही न मिळाल्यामुळे ती संतापली आहे. तिने तिला आलेला हा वाईट अनुभव इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

गौतमी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये पाहायला मिळतंय की, गौतमीने लिहिले की, पैसे ट्रान्सफर केले का? त्यावर तिला चेक करते असा रिप्लाय समोरच्या व्यक्तीने दिला. त्यानंतर दोन दिवस उलटूनही पैसे न मिळाल्यामुळे गौतमीने पुन्हा मेसेज केला. तिने लिहिले की, मी तुम्हाला संपर्क करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. एखाद्या कलाकाराला एखाद्या गोष्टीसाठी एवढ्या वेळा पाठपुरावा करावा लागतो हे खरोखरचं अस्वीकार्य आहे. सोमवारपर्यंत माझे पैसे मला ट्रान्सफर करा.

या मेसेजवर रिप्लाय न आल्यामुळे गौतमीने पुढच्या मेसेजमध्ये त्या व्यक्तीला ताकीद दिली. तिने लिहिले की, तुम्ही उत्तर पण देऊ शकत नाही का? जर, मला उत्तर देण्याचं सौजन्य तुमच्यामध्ये नसेल तर या सगळा प्रकार मी इन्स्टाग्रामवर शेअर करणार आहे. एवढे होऊनही गौतमीला समोरून उत्तर न मिळाल्यामुळे हा सगळा प्रकार अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केला.

गौतमी देशपांडेने व्यक्त केली खंत गौतमी देशपांडेने पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली. ती म्हणाली की, जेव्हा पैशांचा प्रश्न येतो…तेव्हा लोक असं वागतात. मला या क्षणी खरंच खूप वाईट वाटतंय. आपण केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला असा मिळतो आणि स्वत:च्या पैशांसाठी पाठपुरावा करावा लागतो.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे