Join us

"लग्नाआधी शुभांगी मावशीने घरी राहायला बोलवलं तेव्हा…" ,सुव्रत जोशीने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:53 IST

Suvrat Joshi And Sakhi Gokhale : सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. सुव्रत आणि सखीने २०१९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि सखी गोखले (Sakhi Gokhale) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. सुव्रत आणि सखीने २०१९ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध फुलले. सुव्रत आणि सखी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत ते प्रेम व्यक्त करत असतात. दरम्यान आता सुव्रत आणि सखीने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले. लग्नाआधी सुव्रत सखीच्या घरी राहायला गेला होता, हा किस्सादेखील त्याने या मुलाखतीत सांगितला.

सुव्रत जोशीला विचारण्यात आले की, तुला असं कधी वाटलं होतं का की, तुझ्या सासूबाई म्हणजेच शुभांगी गोखले तुला लग्नाआधी घरी राहायला बोलवेल. त्यावर सुव्रत म्हणाला की, खरेच नव्हतं. पण तिचा चॉइस नव्हता. तिला इंपोज केलं होतं. त्यावेळी मी मुंबईत नवीन होतो. मी अनेक वर्षे दिल्लीत होतो. इथे आल्यावर मला पचनाचा विकार झाला होता आणि त्यावेळी दिल दोस्ती दुनियादारी मालिकेचं शूटिंग जोरदार सुरु होते आणि त्यावेळी एकही दिवस सुट्टी नव्हती. त्यामुळे तिने मला राहायला दिलं ते मदत म्हणून दिलं होतं. 

तो पुढे म्हणाला की, ते तिच्या स्वभावाचा चांगुलपणा आहे. ती लाड करते आणि एखाद्याची काळजी मनापासून घेते. आता जावई म्हणून जे लाड करते ते वेगळे आहेत आणि त्यावेळी तिने माझी खूप काळजी घेतली. ते अपेक्षित नव्हते. त्यामुळे नंतर माझी जबाबदारी खूप वाढल्यासारखे वाटले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य नसतानाही सखी आणि शुभांगी मावशीने माझ्यासाठी खूप केले. आईकडून लाड कसे करायचे हे शिकलो होतो. पण आता मी शुभांगी मावशी कडून लाड कसे करायचे हे शिकलो. 

टॅग्स :सुव्रत जोशीसखी गोखले