Join us

सरकारला कधी जाग येणार? मराठी कलावंतांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 4:17 PM

मराठी चित्रपटांना सिनेमागृहे मिळत नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ये रे ये रे पैसा2’ या चित्रपटातील कलाकारांसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील तमाम कलावंतांनी याविरोधात आवाज उठवला असून सरकारला कधी जाग येणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देमराठी चित्रपट वाचवा अशी सादही त्यांनी घातली आहे.

मराठी चित्रपटांना सिनेमागृहे मिळत नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठी चित्रपटांसाठी काही हक्काची सिनेमागृहे आहेत. येथे वर्षानुवर्षे मराठी चित्रपट झळकतात. तथापि मल्टिप्लेक्समध्येही एक स्क्रिन मराठी चित्रपटांसाठी उपलब्ध करून द्यावा, असा सरकारी नियम असताना या नियमाची अंमलबजावणी होत नाही. याचा फटका आजही अनेक मराठी चित्रपटांना बसतो आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ये रे ये रे पैसा2’ या चित्रपटातील कलाकारांसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील तमाम कलावंतांनी याविरोधात आवाज उठवला असून सरकारला कधी जाग येणार? असा सवाल उपस्थित केला आहे. मराठी चित्रपट वाचवा अशी सादही त्यांनी घातली आहे.अनेक मराठी कलावंतांनी सोशल अकाऊंटवर सरकारला कधी जाग येणार? अशा आशयाची पोस्ट  शेअर केली.

 ‘ सरकारला कधी जाग येणार????भारताच्या स्वातंत्र्य दिनीमहाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय... ‘ये रे ये रे पैसा 2’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटाने गेल्या आठवड्यात उत्तम पैसे कमवूनसुद्धा ह्या आठवड्यात ह्या चित्रपटाला थिएटर्स मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे कारण दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत, ही मराठी चित्रपटांची महाराष्ट्रातील अवस्था आहे आणि जर हे असंच चालू राहिलं तर मराठी चित्रपटांनी पैसे कमवायचे तरी कसे...????अमेय खोपकर गेली 12 वर्षे मराठी सिनेमांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना थिएटर्स मिळवून दिली आहेत आणि आज त्यांचा स्वत:चा सिनेमा असल्यामुळे ह्या चित्रपटासाठी भांडणे त्यांच्या तत्वात बसत नाही. पण आता पाळी आपली आहे आपण म्हणजेच मराठी चित्रपट सृष्टीने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे..!!सरकारला कधी जाग येणार????असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :ये रे ये रे पैसा २प्रसाद ओक