Join us  

तेजश्री प्रधानची कोणती इच्छा पूर्ण झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2017 12:52 PM

प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते. त्याचबरोबर आपल्या अभिनयाच्या करियरमध्ये एखादया मोठया दिग्दर्शकासोबत काम करण्यास मिळावे अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा ...

प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते. त्याचबरोबर आपल्या अभिनयाच्या करियरमध्ये एखादया मोठया दिग्दर्शकासोबत काम करण्यास मिळावे अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. कलाकाराची ही इच्छा पूर्ण झाले की, त्याच्या आनंदाला चार चाँद लागतात. सध्या अशीच एक इच्छा अभिनेत्री तेजश्री प्रधानची पूर्ण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. तेजश्रीने नुकतीच आपली ही इच्छा सोशलमीडियावर पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते, हा माझा दिग्दर्शक सतीश राजवाडेसोबतचा पहिला सेल्फी आहे. ती सध्या काय करते दिग्दर्शक सतीश राजवाडे तुज्या बरोबर काम करणं हे स्वप्न होतं. आज प्रत्येकजण अनुराग आणि तन्वी मधे स्वताला पाहतोय. कुठेतरी राहून गेलेली, प्रवाहात सुटुन गेलेली नाती आठवून माणुसकीला साद घालू पाहतोय आणि हिचं इच्छा मनात धरून तू आणि पल्लवीने या सिनेमाची वाट धरलीत ना...तुम्ही जिंकलात !!! आणि आज हे मिचं नाही तर अवघा महाराष्ट्र नव्हे तर प्रत्येक मराठी माणूस म्हणतोय तुझा (आपला) सिनेमा पाहून. तुमचे कष्ट, तगमग, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा ताण आणि सर्वात महत्वाचं सिनेमा करताना येणाºया असंख्य अडचणींना सामोरं जाताना तुम्ही सांभाळलेला तुमच्यातला संयम, तुमच्यातला तो प्रेमळ माणुस आणि तुमच्या या प्रत्येक क्षणाचं साक्षीदार मला होता आलं त्यासाठी शतश: आभार.. आजच्या दिवसाचं निमित्त साधून इतकचं सांगते, मला जाणीव आहे आणि कायम राहील तुमच्या चांगुलपणाची, तुमच्या माणुसकीची.. तुज्या मधल्या कलेला माझा सलाम.. अशाचं छान छान सिनेमे तू करत रहा आणि दर वर्षीतले प्रत्येकाच्या आयुष्यातले किमान २ तास हे सतीश राजवाडे या दिग्दर्शकाच्या फिल्म्स बघण्यात जावोत.. जिवेत शरद: शतम्!! तेजश्रीने आपली इच्छा खास दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली आहे. तेजश्री ही होणार सून मी हया घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.