Join us

तर प्रसाद ओकच्या जागी हा अभिनेता दिसला असता आनंद दिघेंच्या भूमिकेत, प्रविण तरडेंचा खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 5:18 PM

Pravin Tarde :एका मुलाखतीत प्रविण तरडेंनी आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक नाही तर मराठी सिनेइंडस्ट्रीतला दुसरा अभिनेता साकारणार होता, याचा खुलासा केला.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रसाद ओक(Prasad Oak)ने या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. त्याने आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत असे चित्रपट समीक्षक म्हणणे होते. त्यासाठी प्रसादला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान आता एका मुलाखतीत प्रविण तरडेंनी आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक नाही तर मराठी सिनेइंडस्ट्रीतला दुसरा अभिनेता साकारणार असल्याचा खुलासा केला. 

बोल भिडू या युट्यूब चॅनेलला प्रविण तरडे आणि उपेंद्र लिमये यांनी नुकतीच मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी एस.एस. राजामौली आणि साऊथ सिनेइंडस्ट्रीच्या अनुभवाबद्दल सांगितले. त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांची भूमिका सुरुवातीला उपेंद्र लिमये साकारणार असल्याचा खुलासा केला. प्रविण तरडे म्हणाले, राजमौली यांच्यासारखे तुमचे राज्य, तुमची भाषा, तुमच्या समाजाच्या जगण्यावागण्याचे प्रश्न कुठेतरी पुढे घेऊन मला जायचे आहेत. म्हणून माझे आदर्श राजमौली आहेत. त्यांना कधी भेटेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र एक योग आला, तो म्हणजे धर्मवीर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शन.

सर्व श्रेय आनंद दिघेंचं आहेते पुढे म्हणाले की, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट मोठ्या पातळीवर रिलीज झाला होता. झीचे पाठबळ होते. चित्रपट तितक्याच ताकदीने बनवला होता. याच्यात माझे लेखक-दिग्दर्शक म्हणून श्रेय असण्याचे काही काम नाही. कारण ते सर्व श्रेय आनंद दिघेंचं आहे. 

आनंद दिघेंची भूमिका उपेंद्र लिमये करणार होता...सुरुवातीला आनंद दिघेंची भूमिका उपेंद्र लिमये करणार होता. म्हणजे मी चित्रपट बनवायच्याही आधी आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटाचे काम चार-पाच वर्ष आधीच सुरू झाले होते. त्यावेळी उपेंद्र लिमये आनंद दिघे यांची भूमिका करणार होता. खरेतर माझ्या प्रत्येक चित्रपटात तू असतोस. पण आपले ते राहिले, असे  तरडे म्हणाले.

टॅग्स :प्रवीण तरडेप्रसाद ओक उपेंद्र लिमये